घरताज्या घडामोडीजया बच्चनसह ऐश्वर्या, आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

जया बच्चनसह ऐश्वर्या, आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Subscribe

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्या व्यतिरीक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो. त्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अमिताभ-अभिषेक यांची प्रकृती स्थिर

अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अभिषेक बच्चन

‘मी आणि माझे वडील आम्हा दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आम्हाला दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आलेय. मी सर्व स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. मी सर्वांना विनंती करतो की शांत राहा आणि घाबरू नका. धन्यवाद’, असे टविट करत अभिषेकने माहिती दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अमिताभ बच्चन

‘माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच मागील १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी’ अशी विनंतीही बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.


हेही वाचा – अभिनेत्री रेखा यांचा बंगला पालिकेकडून सील; सुरक्षा रक्षक निघाला कोरोना पॉझिटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -