Coronavirus – आता मोबाईलवरून घरबसल्या करा करोना टेस्ट!

देशात पाचशेहून अधिकजण करोनाबाधीत आहेत. त्यातील ११ जाणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai
corona test kit
करोना टेस्टिंग किट

करोनाग्रस्त लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी उपचार सुरू आहेत. तरीही दरोरोज एक – दोन करोनाबाधीत रूग्ण सापडत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे असे काही लक्षणे करोनाबाधीतांची आहेत. पण साधा तापजरी आला तरी आपला करोना झालायअशे समजून नागरिक हॉस्पिटलमध्ये धाव घेत आहेत. त्यामुळे हॉस्पिटल ओसंडून वहात आहेत. त्यामुळे यावर अपोलो हॉस्पिटलने अक नामी युक्ती काढली आहे. तुम्ही आता घरात बसून मोबाईलवरून तुमची टेस्ट करू शकता. त्यामुळे तुम्हाला करोना झाला आहे की नाही हे बसल्या जागी तुम्हाला कळू शकते.

अशी करा टेस्ट

अपोलो हॉस्पिटलने एक लिंक दिली आहे. या लिंकवर जावून सेल्फ टेस्टिंग असाइनमेंट दिले आहे. इथे तुम्ही स्वत:ची सेल्फ टेस्ट करू शकता. तुमचे आरोग्य कसे आहे. जर यावेळी आरोग्य खूपच खालावले असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. व उपचार करा.

१. सर्वात आधी तुम्हाला तुमचे वय विचारले जाईल

२. त्यानंतर तुमचे जेंडर

३. नंतर तुमच्या शरीराचे तापमान किती हे तुम्हाला सांगावे लागेल

४. तुमच्या शरीरात कोणते बदल होत आहेत. तुम्ही प्रवास केला आहे का?, याची माहिती द्यावी लागेल

५. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कोविड रिस्क रिजल्ट मिळेल.

फक्त ही प्रक्रीया करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तुम्हाला काहीही चुकीची माहिती सांगायची नाहीये.

अपोलोने आपल्या वेबसाइटवर एक इमरजन्सी नंबर ०८०४७१९२६०६ प्रसिद्ध केला आहे. या नंबरचा आपातकालीन स्थितीत वापर करू शकता. देशात पाचशेहून अधिकजण करोनाबाधीत आहेत. त्यातील ११ जाणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here