चीनला झटका! चीन सोडून Apple च्या ८ मोबाईल फॅक्ट्रीज भारतात

Appleने आपल्या ८ फॅक्ट्रीज चीनमधून भारतात हलवल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली

चीन सोडून Apple च्या ८ मोबाईल फॅक्ट्रीज भारतात

भारत-चीन सीमावादावरून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान भारत चीनला जशास तसे चोख उत्तर देत आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने एक मोठे पाऊल उचलले असून चीनमध्ये असलेला आपला टीव्ही कारखाना बंद करण्याचा निर्णय सॅमसंगने घेतल्यानंतर आता जगातली सर्वात मोठी टेक कंपनी Apple ने देखील चीनला मोठा झटका दिला आहे. Appleने आपल्या ८ फॅक्ट्रीज चीनमधून भारतात हलवल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. ते व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत होते.

आता भारत जागाचे प्रॉडक्शन हब म्हणून उदयास येत आहे. बदलत्या परिस्थितीचे भारत संधीत रुपांतर करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनविरुद्ध जे धोरण अवलंबले, त्याला अमेरिका, इंग्लंड, जापान आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठमोठ्या देशांचे समर्थन मिळाले आहे, असे रविशंकर प्रसाद हे जगातील नागरिकांनी संवाद साधताना म्हणाले.

यासह रविशंकर प्रसाद म्हणाले, आम्ही २०१४ मध्ये सत्तेत आलो. तेव्हा भारतात केवळ दोनच मोबाईल कंपन्या होत्या आता ही संख्या २५० वर पोहोचली आहे. आपण आत्मनिर्भर भारत अभियान लॉन्च केले. आपण जगातील अनेक कंपन्यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. भारत जगातील आर्थिक शक्ती म्हणून समोर येत आहे.


चीनला आणखी एक धक्का; चायनीज टिव्ही फॅक्ट्री बंद करणार Samsung

दरम्यान, केंद्र सरकारने पबजीसह ११८ चीनी अॅपवर बंदी घातली. यापूर्वीही सरकारने जवळपास १०० हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. नुकत्याच बंदी घातलेल्या अॅपमध्ये पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सचा समावेश होता. भारत सरकारच्या या निर्णयाचा चीनने निषेधही केला होता.