घरदेश-विदेशअॅपलला हवी आहे चीनी बाजारपेठ

अॅपलला हवी आहे चीनी बाजारपेठ

Subscribe

चीन ने अॅपल कपंनीला बाजारात जागा द्यावी अशी मागणी अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी केली आहे. अॅपल कंपनीच्या वस्तूंसाठी चिनी बाजारपेठ योग्य पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगातील प्रसिद्ध कंपनी अॅपल सध्या चीनी बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहे. चीनी बाजारात माल खपवण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये चीनमध्ये अॅपलची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे एका मोठी बाजारपेठ आपल्या हाथून जाईल अशी भिती अॅपल कंपनीला वाटत आहे. चिनी बाजारपेठेत अॅपल मोबाइल्सची मागणी कमी झाल्याने अॅपल चिंतेत आहे. चीनच्या लोकल मोबाईल कंपन्यांचे फोन बाजारात आल्यानंतर लोकांमध्ये अॅपलची मागणी कमी झाली आहे. हुवावेई आणि शीओमी (Huawei and Xiaomi) या कंपन्यांच्या मोबाइलची मागणी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अॅपलची मागणी चीनमध्ये कमी झाली आहे. चीन मध्येच नाही तर इतर देशांना या फोन्सची अधिक मागणी आहे. त्यामुळे अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी चीनकडे मागणी केली आहे.

- Advertisement -

कंपनीने केली आकडेवारी जाहीर

अॅपल कंपनीने मागील काही वर्षाची आकडेवारी जाहीर केली आहे. चीनमधील बाजारपेठेत अॅपल फोन्सची विक्री ८१.२ टक्क्याहून खाली घसरून ५४.६ टक्के झाली आहे. याची जागा लोकल मोबाइल फोन कपंन्यांनी घेतली आहे. “चीन आमच्या मालासाठी आपली बाजारपेठ उघडी ठेवेल. आवश्यक असलेल्या गोष्टींची आम्ही काळजी घेत आहोत.” अशी माहिती कुक यांनी दिली आहे. चीनमध्ये अनेक वस्तू स्वदेशीच वापरल्या जातात. चीनमध्ये सोशल मीडियाचा वापर जास्त केला जातो. मात्र या साईट्स तेथील स्थानिक कंपन्यांच चालवतात. यामुळे येथे परदेशी वस्तू वापल्या जात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -