घरदेश-विदेशInternational Yoga Day: माणसांप्रमाणे प्राण्यांनीही केली योगसाधना

International Yoga Day: माणसांप्रमाणे प्राण्यांनीही केली योगसाधना

Subscribe

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या डॉग स्कॉड पथकातील कुत्र्यांनी आपल्या प्रशिक्षकांच्या सहाय्याने योगा केल्याने अनेकांनी केले कौतुक

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. आज संपुर्ण देशभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथील मैदानात सुमारे ४० हजार लोकांसोबत योगासनं केली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह नांदेड येथे योगासनं केली.

देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जवानांनी अनोख्या पद्धतीने हा योग दिवस साजरा केला आहे. यापैकी काही आयएनएस युद्ध नौकेवर योग साधना करताना दिसून आले. तर, काही हिमालयामध्ये बर्फोच्छादित डोंगरात आपला योग दिन साजरा केला. यासोबतच, योग दिनानिमित्ताने माणसांप्रमाणे प्राण्यांनी देखील काही ठिकाणी योगसाधना केल्याचे दिसले.

- Advertisement -

बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या डॉग स्कॉड पथकातील कुत्र्यांनी आपल्या प्रशिक्षकांच्या सहाय्याने योगा केल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

- Advertisement -

गुरुग्राम येथे हरियाणा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी घोड्यांच्या पाठीवर स्वार होऊन योगाची प्रात्यक्षिके योग दिनानिमित्त सादर केली.

१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असणाऱ्या रोहतांग पासच्या सीमेवर इंडि तिबेटीयन पोलिसांनी योगसाधना तसेच प्राणायम करून हा योग दिवस साजरा केला.

लडाखमध्ये १८ हजार फूट उंचीवर जाऊन २० अंश सेल्सिअस तापमानात इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी योगा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -