घुसखोरीचा कट उधळला

तीन दहशतवाद्यांचा खात्मा

प्रातिनिधिक छायाचित्र

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांची कारवाई सुरूच आहे. दरम्यान, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. मात्र, लष्करी अधिकार्‍यासह दोन जवान शहीद झाले आहेत.

शनिवारी रात्री माछिल सेक्टरमध्ये एलओसीवर संशयित हालचाली आढळून आल्या होत्या. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला व घटनास्थळावरून एक एके-47 रायफल आणि दोन बॅग हस्तगत करण्यात आल्या होत्या. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमधील कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे शहीद झाले. जवानांकडून परिसरात अद्यापही शोधमोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.