अर्णब गोस्वामी : दोन दिवस बिस्कीट हेच अन्न

बाहेरचे अन्न देण्यास पोलिसांनी दिला नकार, बाहेरचे अन्न, तसेच बिसलरी पाणी देण्याची मागणी

Arnab Goswami

न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी न्यायालयीन कोठडीचे जेवण घेण्यास नकार देत आपल्याला बाहेरचेच जेवण देण्यास सांगितले. पण, तुम्हाला नियमाप्रमाणेच नाश्ता, भोजन आणि पाणी मिळेल, असे ठामपणे बजावत बाहेरचे अन्न देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्यामुळे दोन दिवस बिस्कीट हेच त्यांचे अन्न झाले आहे.

गुरुवारी रात्री आणि आणि शुक्रवारी सकाळी गोस्वामी यांनी कैद्यांसाठी असलेले अन्न घेण्यास नकार देत बाहेरचे अन्न, तसेच बिसलरी पाणी देण्याची मागणी केली. मात्र, जे आमच्या नियमात असेल तेच अन्न, पाणी देणार असे सांगत पोलिसांनी बाहेरचे अन्न, पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे गुरुवारची रात्र आणि आणि शुक्रवारी दुपार अशा दोन्ही वेळा त्यांनी बिस्किटेच खाणे पसंत करून कैद्यांचे अन्न स्वीकारण्यास नकार दिला. सुरुवातीला कोविड सेंटरमध्ये एका खोलीत अर्णबसह तिघांना ठेवण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्रीपासून गोस्वामी यांना एकट्यालाच एका खोलीत, तर अन्य दोघांना दुसर्‍या खोलीत एकत्र ठेवण्यात आले आहे.