घरदेश-विदेशअर्णब यांना दिलासा नाही, आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी

अर्णब यांना दिलासा नाही, आज पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी

Subscribe

गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता शनिवारी दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना शुक्रवारी मुंबई हाटकोर्टात अंतरिम दिलासा मिळाला नाही. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता शनिवारी दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आपल्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावा तसेच तत्काळ आपल्याला जामीन मिळावा, यासाठी अर्णब यांच्यावतीने हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे.

- Advertisement -

अर्णब यांच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी वेळी तक्रारदार आज्ञा नाईक, सरकारी पक्ष आणि पोलिसांची बाजू ऐकूनच निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने नमूद केले होते. याप्रकरणी पुढील सुनावणी आज ठेवण्यात आली होती. आज दुपारी ३ वाजता कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांच्यावतीने हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुनावणी चालली. त्यानंतर ‘आज सुनावणी पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे उद्या दुपारी ११ वाजता आम्ही पुन्हा सुनावणी ठेवू, असे नमूद करत कोर्टाने अर्णब यांना आज कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -