भारतामध्येही होऊ शकते बैरूतसारखी भीषण दुर्घटना, तब्बल ७४० टन अमोनियमचा साठा!

चैन्नई शहराबाहेर ७४० टन अमोनियम नायट्रेटटा साठा असल्यामुळे बैरूतसारखी भीषण दुर्घटना भारतामध्येही होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

around 740 tonnes ammonium nitrate stored in chennai officials on alert after beirut blast
चेन्नईमध्येही होऊ शकते बैरूतसारखी भीषण दुर्घटना

लेबनानची राजधानी असलेल्या शहरात ४ ऑगस्ट, मंगळवारी दोन महाभयंकर स्फोट झाले आहेत. या स्फोटामध्ये १३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ हजार नागरिक जखमी झाले आहेत. हा स्फोट अमोनियम नायट्रेट या रासायनिक स्फोटामुळे झाला असल्याचे उघडकीस आले आहे. अशीच घटना चेन्नईमध्येही होऊ शकते. कारण चैन्नई शहराबाहेर ७४० टन अमोनियम नायट्रेटटा साठा आहे.

चेन्नईबाहेर २०१५ साली ७४० टन अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. तसेच या रासायनिक स्फोटकाची किंमत जवळपास १.८० कोटी रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार; अमोनियम नायट्रेटचा विल्हेवाट लावण्यासाठी त्याची ई-निलामी केली जाणार आहे. तर चेन्नई बंदरावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी अमोनियम नायट्रेट बंदरापासून दुसरीकडे स्थालांतरित करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

६९० मॅट्रिक टन अमोनियम नायट्रेट जप्त

२०१५ साली चेन्नई कस्टमकडून ६९० मॅट्रिक टन अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. अमोनियम नायट्रेटचा हा सर्वा साठा ३७ कंटेनरमध्ये ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या साठ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


हेही वाचा – फेब्रुवारीमध्ये होणार ‘गेट २०२१’ परीक्षा