जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर प्रदेशच्या सहरानपूर जिल्ल्यातून जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.

Mumbai
arrest-jem-terrorist-in uttar pradesh
जैश.ए.मोहम्मद,जैश.ए.मोहम्मदच्या अतिरेक्यांना अटकत

उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी महत्वाची कामगिरी बजावत दोन संशयित अतिरेक्यांना अटक केली आहे. देवबंद वस्तिगृहावर छापा मारत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यातील एकाच नाव शाहनवाझ असून तो जम्मू-कश्मीरच्या कुलगाम येथील रहिवासी आहे. तर दुसऱ्याचे नाव आकिब असून तो काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी आहे. दोघेही पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकरलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील सदस्य आहेत.

UP DGP OP Singh: Yesterday after inputs two suspected terrorists were caught from Saharanpur by our ATS wing. They are linked to JeM and both are from Kashmir. Shahnawaz is from Kulgam and Aqib is from Pulwama pic.twitter.com/ENRuf34bgz

— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2019

संशयीत वस्तू आढळल्या

दरम्यान, पोलिसांना या दोनही संशयीत आरोपींकडे ३२ बंदुका आणि जिवंत काडतुसं आढळली आहेत. त्याचप्रमाणे जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधीत फोटो आणि व्हिडिओदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच या दोघांचे वय केवळ २० आणि २५ इतकेच आहे. त्यामुळे या दोघांचाही पुलवामा हल्ल्याशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अटकेमुळे पुलवामा हल्ल्याच्या तपासाला वेग येणार आहे.

जैशमध्ये करत होते भर्ती

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दोघेही जैश-ए-मोहम्मद संघटनेमध्ये भरतीचे काम करत होते. संघटनेत सहभागी करता येतील अशा तरुण मुलांचा शोध घ्यायचा. त्यांचं ब्रेन वॉश करायचा आणि त्यांना संघटनेत सहभागी करुन घ्यायचं, या कामासाठी ते उत्तर प्रदेशात आल्याची प्राथमिक माहिती आतापर्यंत समोर आली आहे. पुलवामा दहशतवीदी हलल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले आहेत. या पार्शवभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुलवामा हल्लयाशी संबधीत धागे-दोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here