घरट्रेंडिंगBreaking : नीरव मोदीचं अटक वॉरंट अखेर जारी

Breaking : नीरव मोदीचं अटक वॉरंट अखेर जारी

Subscribe

'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं नीरव मोदी लंडनमध्ये फिरत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता.

भारतीय बँकाना चुना लावून लंडनमध्ये पलायन केलेला उद्योगपती नीरव मोदी, याच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी केलं गेलं आहे. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे. सुमारे एक ते दीड वर्षापूर्वी पीएनबीमध्ये झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदीचं नाव प्रमुख होतं. हा घोटाळा करुन नीरव लंडनमध्ये फरार झाला होता. नीरव मोदीने पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा केला होता. सध्या नीरव लंडनमध्ये वास्तव्याला असून, त्याला आरोपी म्हणून भारतात आणण्याची मागणी याआधी अनेकदा करण्यात आली आहे.  ‘द टेलिग्राफ’ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं नीरव मोदी लंडनमध्ये फिरत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो ‘वेस्ट एन्ड लंडन’मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.

वाचा: लंडनमध्ये ९ लाखांच्या जॅकेटमध्ये दिसला नीरव मोदी

नीरव मोदी फरार होऊन लंडनमध्ये गेल्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न केले गेले होते. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं २०१८ च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावाने रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती. मात्र, काही ना काही कारणाने नीरव मोदीला भारतात परत आणण्यात सरकारला अपयश येत होतं. दरम्यान, अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता नीरव मोदीची रवानगी कधी होणार? याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -