घरदेश-विदेशअरूण जेटलींनी आणले पंतप्रधान मोदींना राजकारणात

अरूण जेटलींनी आणले पंतप्रधान मोदींना राजकारणात

Subscribe

नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. मोदींसारखे नेतृत्व देशपातळीवर आले पाहिजे, असा आग्रह सर्वप्रथम मांडणारे अरुण जेटली आहेत

नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर प्रणालीची देशभर अंमलबजावणी, रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यापासून ते देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय देशाचे अर्थमंत्री तसेच भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. वयाच्या ६६ व्या वर्षी श्वसनाचा त्रास असल्याने दिल्लीतील एम्स रूग्णालात अरुण जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने देशभरातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली

अरूण जेटली यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘माझा मोठा भाऊ गेला..’ या शब्दात दुःख व्यक्त केले आहे. तसेच, ” नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. मोदींसारखे नेतृत्व देशपातळीवर आले पाहिजे, असा आग्रह सर्वप्रथम मांडणारे अरुण जेटली आहेत.”, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते केवळ भाजप किंवा शिवसेनेचे नसून देशाचे नेते होते. देशावरील संकटांवेळी ते नेहमीच धावून आले आहेत. आंतराराष्ट्रीय पातळीवर देशाची बाजू प्रभावीपणे ते मांडत असत. क्रिकेट, उद्योग आणि राजकारणापलिकडील क्षेत्रातही त्यांचा प्रामुख्याने वावर होता. शिवसेनेसोबत २०१४ साली भाजपाचे संबंध तुटल्यानंतर अस्वस्थ झालेले नेते अरुण जेटली होते. घटकपक्षांना सन्मान देण्याची त्यांची आग्रही भूमिका होती. सुषमाजींच्या निधनानंतर अरुणजींचं जाणं हे देशाच्या राजकारणातील दोन मोठे स्तंभ कोसळण्यासारखे आहे. आज आमचा मोठा भाऊ गेला. अशा शब्दात संजय राऊत यांनी जेटलींटच्या निधानानंतर दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -