घरदेश-विदेशपाकिस्तानला झटका; मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला

पाकिस्तानला झटका; मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला

Subscribe

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेटच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीतील काही ठळक मुद्दे प्रसार माध्यमांसमोर मांडले.

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी कॅबिनेटच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला संरक्षण, परराष्ट्र, अर्थ आणि गृह मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीतील काही ठळक मुद्दे प्रसार माध्यमांसमोर मांडले. यावेळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीलाच शहीद जवानांच्या बलिदानासाठी २ मिनिटे मौन पाळले.

बैठकीतील ठळक मुद्दे 

  • जवानांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना सोपवणार
  • बैठकीत काही महत्त्वाचे निर्यण घेण्यात आले आहेत
  • परराष्ट्र मंत्री सर्व शक्य प्रयत्न करेल
  • पुलवामातील संपूर्ण घटनेची माहिती घेतली
  • जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही
  • संपूर्ण देश शहीदांच्या परिवारासोबत आहे
  • शहीदांचं पार्थिव विशेष विमानाने मूळगावी पाठवणार
  • या हल्ल्यात पाकचा थेट हात आहे
  • हल्ल्याच्या कटाचे पुरावे सरकार गोळा करणार
  • पाकचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे
  • या हल्ल्याची मोठी किंमत पाकला चुकवावी लागणार आहे
  • पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडणार
  • राजकीय पातळीवर पाकवर बहिष्कार घालणार
  • दहशतवाद्यांविरोधात भारत कठोर पावलं उचलणार

 

- Advertisement -

हेही वाचा –

Kashmir terror attack: अफगाण युद्धातील दहशतवादी ‘पुलवामा’चा सूत्रधार

Pulwama Terror Attack : बॉलीवूडकरांनी नोंदवला निषेध

- Advertisement -

Pulwama attack : दहशतवादी हल्याचे पडसाद; गृहमंत्री जाणार काश्मीरला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -