घरदेश-विदेश४० च्या बदल्यात ४०० मारा - अरविंद केजरीवाल

४० च्या बदल्यात ४०० मारा – अरविंद केजरीवाल

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारला पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ मार्चपासून उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन मोदी सरकार राजकारण करीत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ‘सत्ताधारी भाजपने पाकिस्तानला धडा शिकवायला हवा’, असे केजरीवाल म्हणाले आहेत. त्याचबरोबर ‘४० च्या बदल्यात ४०० मारा, तरच बदला पूर्ण होईल’, असेही केजरीवाल म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या विरोधात आम्ही नरेंद्र मोदींसोबत आहोत. मात्र, पाकिस्तानाविरोधात भाजप सरकारने कठोर पाऊल उचलले पाहीजेत. भारताचा सतत अपमान होत आहे. सीमेवर पाकिस्तान जे हवे आहे, ते करत आहे. मोदी सरकारने पाकिस्तानच्या बाबतीत चुकीचा मेसेज देण्याचे काम केले आहे. मोदी निमंत्रण नसतांनाही नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या कमजोर समजले. त्याचबरोबर पठाणकोठमध्ये आम्ही आयएसआयला चौकशीसाठी बोलवले. मात्र, त्यांच्याच दहशतवाद्यांनी एअरबेसवर हल्ला केला. ते आमचे ४० जवान मारतात, तर आम्ही त्यांचे ४०० मारले पाहिजेत. तरच पाकिस्तान आपल्यासोबत बरोबरीची भाषा करेल. नाहीतर आपल्याला कमजोर समजेल.’

- Advertisement -

हेही वाचा –मोदी दिल्ली के लिए, तूँ तो हानिकारक है – अरविंद केजरीवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -