घरताज्या घडामोडी'विधानसभेच्या तिकीटासाठी केजरीवालांनी १० कोटी मागितले'

‘विधानसभेच्या तिकीटासाठी केजरीवालांनी १० कोटी मागितले’

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे घमासान सुरु झाले आहे. आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत पाहायला मिळणार आहे. आपने स्वबळावर ६७ जागा मिळवत २०१५ साली दिल्ली विधानसभेवर एकहाती विजय मिळवला होता. मात्र यावेळची निवडणूक आपसाठी सोपी नाही. विधानसभेचे तिकीट देण्यासाठी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी माझ्याकडे १० कोटी मागितले होते, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आपचे आमदार आदर्श शास्त्री यांनी केला आहे. आदर्श शास्त्री हे आपकडून द्वारका मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. आदर्श शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे नातू आहेत. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे ते सह संयोजक होते.

आदर्श शास्त्री यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळच्या निवडणुकीत तिकीट वाटप करत असताना पक्षाने प्रत्येक उमेदवाराकडे १० ते २० कोटींची मागणी केली असल्याचे शास्त्री यांनी सांगितले. द्वारका मतदारसंघासाठी शास्त्री यांचे तिकीट पक्षाने कापल्यानंतर त्यांनी आपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याजागी आपने विनय मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.

- Advertisement -

आप पक्षावर याआधी देखील पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्ली मतदारसंघासाठी बलबिर सिंह जाखर यांनी अरविंद केजरीवाल यांना सहा कोटी दिले असल्याचा आरोप बलबिर यांचा मुलगा उदय याने केला होता. मात्र बलबिल सिंह जाखर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर ११ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -