घरदेश-विदेशठरलं! शिवसेनेचे अरविंद सावंत घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

ठरलं! शिवसेनेचे अरविंद सावंत घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

Subscribe

शिवसेना नेते आणि लोकसभा निवडणुकीतील दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

केंद्रीय मंत्रीमंडळात कोणकोणत्या खासदारांचा समावेश होणार यावर तर्कवितर्क सुरु असताना राज्यातून एक नाव नक्की झाले आहे. शिवसेना नेते आणि लोकसभा निवडणुकीतील दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यसभेचे खासदार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. राष्ट्रपती भवनात आज, सांयकाळी सात वाजता शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठीची शपथ घेणार असून काही खासदांराना केंद्रीय मंत्री म्हणूनही शपथ देण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शपथविधीसाठी अरविंद सावंत आज पहाटेच आपल्या कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासहित उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा फोन आला असून त्यांनाआज, संध्याकाळी ५ वाजता पीएमओ ऑफिसमध्ये येण्याचं निमंत्रण दिले आहे. आज संध्याकाळी अरविंद सावंत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

- Advertisement -

दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली 

गेल्या मंत्रिमंडळात शिवसेनेचा फक्त एक मंत्री होता. या वेळी किमान दोन मंत्रिपदे शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, भावना गवळी, विनायक राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत यांची नावे चर्चेत होती. दक्षिण मुंबईमधून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना १ लाख ६७ मतांनी पराभूत करून अरविंद सावंत हे दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. सावंत यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून तर संसदेत सर्वात जास्त उपस्थिती असलेले खासदार म्हणून गौरवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

काँग्रेस १ महिना डिबेटबाहेर; माध्यमांवर बहिष्कार

ICC World Cup 2019: विश्वचषक क्रिकेटचा सामना आजपासून रंगणार

अखेर मोदी सरकारमधल्या संभाव्य मंत्र्यांची नावं ठरली….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -