आमच्यावर आरोप करण्याअगोदर राज ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे – ओवेसी

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार दिला आहे.

Telangana
Asaduddin owaisi
एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात राम मंदिराच्या मुद्यावरुन दंगली घडवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. हा कट भाजप रचत असून यात ओवेसी बंधूंची मदत घेतली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना ओवेसी म्हणाले की, राज ठाकरेंनी आमच्यावर आरोप करण्याअगोदर आत्मपरिक्षण करावे. राज ठाकरे राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमचं नाव घेत आहेत, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.

हेही वाचा – दंगलीबद्दल माहिती असेल, तर पोलिसांना कळवा – संजय राऊत

नेमकं काय म्हणाले ओवेसी?

आज ओवेसी तेलंगणाच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, आमच्या शिवाय राजकारणच होत नाही. राज ठाकरे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवर हल्ले का करतात? समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करण्याअगोदर स्वत:चे आत्मपरिक्षण करावे, असे ओवेसी यांनी राज ठाकरेंना पलटवार केला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे राजकारणात जिवंत राहण्यासाठी असे बोलत आहेत. राजकारणात जिवंत राहण्यासाठी ते असं काही बोलत असतील तर आमची काही हरकत नाही, असेही ओवेसी म्हणाले आहेत.

हेही वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

शिवसेनेने वक्तव्याची खिल्ली उडवली

दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्याची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. जर दंगलीबद्दल तुम्हाला माहिती असेल, तर पोलिसांना कळवा, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा – अन्यथा राम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात करणार; विहिंपचा इशारा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here