आशा भोसले यांना सॅल्फर्ड विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी

भारताच्या गायिका आशा भोसले यांना इंग्लंडच्या सॅल्फर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट बहाल करत त्यांचा सन्मान केला आहे. याबाबतची माहिती खुद्द आशा भोसले यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

England
singer aasha bhosale

भारताच्या सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी त्यांच्या गोड गळ्याने अनेक गाणी अजरामर केली. त्यांच्या गोड गळ्याने जगभरातील संगीत प्रेमींना भुरळ घातली. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आज इंग्लंडच्या ग्रेटर मँचेस्टर येथील सॅल्फर्ड विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल करत त्यांचा सन्मान केला. याबाबतची माहिती खुद्द आशा भोसले यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

आशा भोसले यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत आशा भोसले या लाल, चंदेरी रंगाचा झगा घातला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोघीजणी दिसत आहेत. ‘सॅल्फर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट स्विकारताना’ अशी फोटोओळ त्यांनी दिली आहे.

विविध पुरस्कारांनी सन्मानित 

संगीत जगतात आशा भोसले यांना ‘आशा ताई’ म्हणून हाक मारली जाते. आशा भोसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संगीत इतिहासात सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड झालेल्या कलाकार म्हणून २०११ मध्ये त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाली. परदे में रहने दो, पिया तू अब तो आजा, दम मारो दम यासारखी एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली आहेत. २००० मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here