घरदेश-विदेशवंचित आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान; अशोक चव्हाणांचा थेट आरोप

वंचित आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान; अशोक चव्हाणांचा थेट आरोप

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला. पुन्हा एकदा राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या पारड्यात मते दिली. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचं नुकसान झाल्याचा थेट आरोपदेखील अशोक चव्हाण यांनी केला.

लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे.

- Advertisement -

जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत – अशोक चव्हाण

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 25, 2019

काय म्हणाले अशोक चव्हाण

काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, अनेक जागांवर वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसला, हे आकडेवारीवरुन दिसतंय. प्रकाश आंबेडकर यांच्या हट्टापायी काँग्रेस-राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालं. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. विजयी होण्यासाठी चार साडेलाख मतांची गरज मात्र अनेक ठिकाणी त्यांच्या उमेदवारांनी लाख-दिड लाख मते घेतली, असं सांगत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. तसेच काँग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार आहेत, असं म्हणणं चूक आहे. देशात सर्व ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आहे. त्याची कारणमीमांसा पुढं होईलच. मात्र, राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये व दिला तरी स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिकाही चव्हाण यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -