घरदेश-विदेशएशियन चॅम्पियन ऐथलीट हकम सिंह भट्टल यांचे निधन

एशियन चॅम्पियन ऐथलीट हकम सिंह भट्टल यांचे निधन

Subscribe

एशियन चॅम्पियन ऐथलीट हकम सिंह भट्टल यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. पंजाबच्या संगरुर येथील हॉस्लिपटलमध्ये त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. यकृत आणि किनडीच्या आजाराने ते गेल्या काही दिवसापासून त्रस्त होते.

एशियन खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकणारे आणि मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित झालेले एथलीट हाकम सिंह भट्टल यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून ते दिर्घ आजाराने त्रस्त होते. पंजाबच्या संगरुर येथील हॉस्लिपटलमध्ये त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

यकृत आणि किडनीसंबंधित आजाराने होते त्रस्त

हाकम सिंह यकृतासंबंधित आजाराने त्रस्त होते. बऱ्याच दिवसापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आर्थिक परिस्थितीमुळे हकम सिंह यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उपचारासाठी बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी अनेक लोकांनी पुढे येऊन मदत केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हाकम सिंह यांच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय सेनेत होते कार्यरत

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारे हाकम सिंह भारतीय सेनेत देखील कार्यरत होते. १९७२ साली ६ सिख रेजिमेंटमध्ये हवलदार पदी त्यांची नेमणुक झाली होती. खेळाच्या विकासामध्ये प्रमुख योगदान दिल्याने त्यांना २९ ऑगस्ट २००८ ला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याहस्ते ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

- Advertisement -

अपघातानंतर खेळ सोडावा लागला

१९९७ च्या बँकॉक एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक जिंकत रेकॉर्ड स्वत:च्या नावावर नोंदविला होता. १९८१ साली गंभीर अपघातानंतर त्यांना खेळ सोडावा लागला. त्यामुळे त्यांच्या अप्रतिम खेळाच्या करिअरचा अंत झाला. १९८७ साली जेव्हा ते आर्मीमधून रिटायर झाले तेव्हा त्यांच्या अनुभव आणि क्षमता लक्षात घेता पंजाब पोलिसांनी २००३ मध्ये त्यांना कॉन्स्टेबल पदाची नोकरी दिली. त्यानंतर ते २०१४ मध्ये रिटायर झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -