गुवाहाटीमध्ये मॉल बाहेर ग्रेनेड स्फोट, सहा जखमी

आसामच्या गुवहाटी शहरात ग्रेनेड स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

Guwahati
Assam: Six people injured in explosion outside a mall on Zoo road in Guwahati
गुवाहाटीमध्ये मॉल बाहेर ग्रेनेडचा स्फोट

आसामच्या गुवहाटी शहरात ग्रेनेड स्फोट झाल्याची घटना घडली आहे. गुवहाटी शहरातील झू रोडवर एका मॉल बाहेर बुधवारी रात्री आठच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा लोक जखमी झाले आहेत. जखमींना गुवहाटीच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी या बॉम्ब स्फोटाचा तपास सुरु केला आहे.