सावधान! विमानाच्या आकाराइतका लघुग्रह २४ हजार KMPH वेगाने पृथ्वीकडे येतोय

asteroid nasa
प्रातिनिधिक छायाचित्र

अमेरिकेची अवकाश तंत्रज्ञान संस्था NASA ने एक सावधानतेचा इशारा जगाला दिला आहे. 2020 RK2 नावाचा एक उपग्रह पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असल्याचे नासाने सांगितले आहे. ७ ऑक्टोबर रोजी हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. मात्र हा उपग्रह पृथ्वीच्या बाजूने जाईल, असेही सांगितले जात आहे. या लघुग्रहामुळे पृथ्वीला नुकसान होईल का? या प्रश्नावर नासाने सांगितले की, लघुग्रह पृथ्वीच्या बाजूने जाणार असल्यामुळे आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही. तरिही सुरक्षेच्या कारणात्सव वैज्ञानिकांनी या लघुग्रहावर करडी नजर ठेवली आहे.

नासाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, Asteroid 2020 RK2 लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने ताशी २४ हजार ४६ किमी वेगाने येत आहे. या लघुग्रहाच्या आकाराचा अंदाज लावला असता त्याचा व्यास ३६ ते ८१ मीटर इतका असून त्याची लांबी ११८ ते २६५ फुट असल्याचे सांगितले जात आहे. वैज्ञानिकांनी लावलेल्या अंदाजानुसार एका बोईंग ७३७ प्रवाशी विमानाइतका या लघुग्रहाचा आकार असावा. तसेच जमिनीवरुन या लघुग्रहाला पाहणे शक्य नाही. ईस्टर्न झोन वेळेनुसार हा लघुग्रह दुपारी १ वाजून १२ मिनिट आि ब्रिटनच्या वेळेनुसार संध्याकाली ६ वाजून १२ मिनिटांनी पृथ्वीच्या जवळून जाईल. नासाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हा लघुग्रह पृथ्वीपासून २,३७८,४८२ मैल दूर राहिल.

२०२५ पर्यंत कोणताही धोका नाही

असंही सांगण्यात येते की २०२० ते २०२५ दरम्यान पृथ्वीला 2018 VP1 नावाचा लघुग्रह आदळण्याची शक्यता आहे. मात्र या लघुग्रहाची लांबी फक्त ७ फुट लांब आहे. मात्र यापेक्षाही मोठा १७७ फुटाचा Asteroid 2005 ED224 वर्ष २०२३ ते २०६४ च्या दरम्यान पृथ्वीवर आदळू शकतो. NASA ची Sentry सिस्टिम अशा लघुग्रहाच्या धोक्यांवर नजर ठेवून असते. पुढच्या १०० वर्षात २२ लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येऊ शकतात, अशी अंदाज नासाने वर्तविला असून त्यावर त्यांचे अधिक संशोधन सुरु आहे.