घरदेश-विदेशअरे बापरे: आकाशात बंद पडले अंतराळयान

अरे बापरे: आकाशात बंद पडले अंतराळयान

Subscribe

NASA ने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रॉकेटचे इंजिन अचानक फेल झाले त्यावेळी त्याचा वेग ८ हजार किमी प्रतितास इतका होता.

आपण रस्त्यातून जात असताना आपली बाईक किंवा कार अचानक बंद पडली तर आपला गोंधळ उडतो. बंद पडलेली गाडी पुन्हा सुरु होईपर्यंत आपला जीव वरखाली होत असतो. मात्र, जर महाकाय अंतराळयान जर आकाशातच बंद पडलं तर? ऐकताक्षणी भितीदायक वाटणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. NASA च्या अंतराळयानाला अवकाशात घेऊन जाणारं ‘बूस्टर’ हे रॉकेट अचानक बंद पडलं. ही घटना घडली तेव्हा अमेरिका आणि रशियाचे दोन अंतराळवीर त्या रॉकेटमध्ये होते. रॉकेटच्या इंजिनामध्ये बिघाड झाला असल्याचं समजताच या दोघांनी, कझाकिस्तानच्या एका मैदानामध्ये अंतराळयानाचे इमर्जन्सी लँडिंग केलं. सुदैवाने या सर्व प्रकारात दोन्ही अंतराळवीर सुखरुप बचावले. इमर्जन्सी लँडिंगनंतर दोन्ही अंतराळवीरांना त्वरित हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रुग्णालयात नेण्यात आलं. ‘सध्या हे दोघंही सुखरुप असून आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असल्याचं’, ‘नासा’कडून सांगण्यात येत आहे.


NASA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या रॉकेटचे इंजिन फेल झाले त्यावेळी यानाचा वेग ८ हजार किमी प्रतितास इतका होता. ‘सोयुज एम.एस १०’ या अंतराळयानाला ‘बूस्टर’ नावाचे रॉकेट अवकाश स्थानकात घेऊन जात होतं. यावेळी अमेरिकेचे निक हग आणि रशियाचे अॅलेक्झी ओवचीनीन हे अंतराळवीर या यानामध्ये होते. उड्डाणानंतर काही काळ सुरक्षित अंतर कापल्यानंतर रॉकेटचं इंजिन अचानक बंद पडलं आणि अंतराळवीराचं कॅप्सूल आपोआप रॉकेटपासून वेगळं होऊन सुखरुप जमिनीवर परतंल. उपलब्ध माहितीनुसार, अशा अपघतांमध्ये रॉकेटपासून आपोआप वेगळा होणारी कॅप्सूल १९६० मध्ये बनवण्यात आली होती.

या अपघातातून बचावलेले दोन्ही अंतराळवीर (सौजन्य-फेसबुक)

दुर्घटना टळली : Air India चं विमान भिंतीला धडकलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -