घरदेश-विदेश'तनिष्क'च्या जाहीरातीचा वाद पेटला; गुजरातमध्ये शोरूमवर हल्ला

‘तनिष्क’च्या जाहीरातीचा वाद पेटला; गुजरातमध्ये शोरूमवर हल्ला

Subscribe

दागिन्यांमधील लोकप्रिय ब्रँड ‘तनिष्क’च्या हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणाऱ्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरु आहे. तनिष्क लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर तनिष्कने ही जाहीरात मागे घेतली. यामुळे हा वाद थंड झाला असं वाटत असताना ‘तनिष्क’च्या गुजरातमधील शोरूमवर हल्ला झाला आहे. तिथल्या मॅनेजरकडून माफीनामा लिहून घेतला.

गेले काही दिवस तनिष्कच्या जाहीरातीवरुन वाद सुरु असून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी या जाहीरातीला विरोध केला. तनिष्क लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये तनिष्कच्या शोरुमवर हल्ला करण्यात आला आणि माफीनामा लिहून घेतला. “ही जाहीरात प्रदर्शित करुन, हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल कच्छ जिल्ह्यातील जनतेची माफी मागतो,” असे मॅनेजरने त्या माफीनाम्यात म्हटलं आहे. गुजरातच्या गांधीधामधमली ‘तनिष्क’च्या शोरूमवर हा हल्ला करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय होती जाहीरात?

हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचं या जाहीरातीत दाखवण्यात आलं. ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने ही जाहिरात मागे घेतली. ‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवड्यात यूट्यूब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहीरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखं प्रेम मिळणाऱ्या हिंदू सुनेच्या डोहाळ जेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहीरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचं मांडण्यात आलं होतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -