ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदींसोबत खायचाय समोसा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समोसा आणि आंब्याची चटणीचा फोटो ट्विटद्वारे शेअर केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत समोसा खाण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

New Delhi
australian pm make samosas pm narendra modi replies
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदींसोबत खायचाय समोसा

जगभरात भारताच्या खाद्यसंस्कृतीची एक वेगळीच ओळख असून इतर देशात भारताच्या खाद्यसंस्कृतीची चर्चा केली जाते. अशीच चर्चा सध्या ऑस्ट्रेलियात असल्याचे पाहायला मिळत आहे. विश्वास बसणार नाही पण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) भारतातील समोसाचे प्रेमी असल्याचे त्यांनी स्वत: सांगत ट्विट केले आहे. विशेष म्हणजे ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत समोसा खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काय म्हणाले स्कॉट मॉरिसन?

स्कॉट मॉरिसन यांनी रविवारी समोसा संदर्भात एक ट्विट केले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबत समोसा शेअर करू इच्छित आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना म्हटले की,’कोरोनाविरोधात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर विजय मिळवल्यावर एकत्र खाऊया. तसेच ४ जून रोजी व्हिडीओ कॉलद्वारे आपली भेट होणार आहे, असे मोदींनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलिया पीएम स्कॉट मॉरिसन ४ जून रोजी व्हि़डीओ लिंक द्वारे माहिती देणार आहेत.


हेही वाचा – मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती – अमित शहा