घरदेश-विदेशभर रस्त्यात रिक्षा चालकाची हत्या

भर रस्त्यात रिक्षा चालकाची हत्या

Subscribe

हैदराबाद शहरात भर रस्त्यात रिक्षा चालकांने हत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी अब्दुल खाजान याला अटक करण्यात आली आहे.

वर्दळीच्या रस्त्यात रिक्षा चालकाची सुऱ्याने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद शहरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर हा प्रकार घडत असताना देखील मारेकऱ्याला कोणही अडवले नाही किंवा त्या रोखण्याचा देखील प्रयत्न केला नाही. याउलट त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. याप्रकरणी आरोपी अब्दुल खाजान या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

हैदराबाद शहरातील चंचलगुडा भागात राहणारा रिक्षा चालक अब्दुल खाजाने त्याच्यासोबत असणारा त्याचा मित्र शकीर कुरेशीवर त्यांनी भर रस्त्यात सुऱ्याने वार करत त्याची हत्या केली. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

वाचा – अश्लिल फोटो काढणाऱ्या तरुणाची हत्या


का केली हत्या?

चंचलगुडा भागात राहणारा रिक्षा चालक अब्दुल खाजाने शकीर कुरेशीला भाड्याने रिक्षा चालवण्यासाठी दिली होती. मात्र शकीर कुरेशीने याबाबत अब्दुल खाजान याला कोणतीही माहिती न देतात. त्यांची रिक्षा तिसऱ्या व्यक्तीला भाड्याने लावली. याचा अब्दुल खाजान याच्या मनात राग होता. त्यावरुन अब्दुल खाजाने शकीरला याविषयीची विचारणा केली असता शकीरने त्याला उडवाडवी केली. या दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. अब्दुल खाजाने रागाच्या भरात आपला हातातील सुरा काढून शकीरवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल देखील उभे होते. पोलिसांनी अब्दुल अडवण्याचा प्रयत्न केला मात्र अब्दुलने न थांबता शकीरवर वार करत राहिला. यात शकीर कुरेशी जागीच ठार झाला. याप्ररकरणी अब्दुल खाजानला मीर चौक पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमधील दोन महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – धक्कादायक! पत्नीच्या अंत्यसंस्कारावेळी पतीची हत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -