घरदेश-विदेशभारतातही अ‍ॅव्हेंजरर्सची क्रेझ

भारतातही अ‍ॅव्हेंजरर्सची क्रेझ

Subscribe

अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ घोषणा झाल्यापासूनच सुपरहिरोचे चाहते आतूरतेने वाट पाहत होते. रविवारपासूनच ‘अऍव्हेंजर एंडगेमची’ तिकीट विक्री सुरू झाली. ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ च्या पहिल्या दिवशीचं तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांनी रात्र जागून काढली आणि तिकीट मिळवलं. चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या अनेक आठवड्यांपर्यंतचे ‘अ‍ॅ्व्हेंजर्स- द एंडगेम’ शो बुक आहेत. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला. या बहुचर्चित चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात ११८५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

मार्वेलचा सुपरहिरो फ्रेंचाइजी ‘अ‍ॅव्हेंजर्स- द एंडगेम’ या हॉलिवूडपटाची भारतीयांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या कमाईच्या आकड्यावरूनच ही क्रेझ केवळ भारताच नाही तर संपूर्ण जगात असल्याचं दिसलं. भारतात इंग्लिश व हिंदीशिवाय तेलगू व तामिळ भाषेत हा चित्रपट रिलीज झाला आहे. ‘अ‍ॅ व्हेजर्स- एंडगेम’ हा मार्वेल स्टुडिओजचा २२ वा चित्रपट आहे. ‘अ‍ॅ्व्हेंजर्स- द एंडगेम’हा मार्वेलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्या लांबीचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात मार्वेल सीरिजच्या २२ चित्रपटांचे सुपरहिरो एकत्र दिसणार आहेत.

- Advertisement -

२००८ साली स्टॅन ली यांनी मार्व्हलची कल्पना मांडली. त्यानंतर पुढे एक- एक भाग करत. तब्बल २२ चित्रपट तयार झाले. ‘अ‍ॅ्व्हेंजर्स- द एंडगेम’ मध्ये या आधीच्या २१ चित्रपटांचा निष्कर्ष बघता येणार आहे. हा ‘अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर’चा दुसरा भाग आहे. या चित्रपटात कॅप्टन अमेरिका, थॉर, हल्क, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक व्हिडो, रॉकेट, नेब्यूला हे सात सुपरहिरो पुन्हा एकदा थेनॉसवर हल्ला करताना दिसत आहेत. हा चित्रपट बघितल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाचं खूप कौतूक केलं आहे. सोशलमिडीयावर ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहणा-या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -