घरदेश-विदेशअयोध्या नगरीत ५ लाख दिव्यांचा लखलखाट; गिनीज बुकमध्ये नोंद

अयोध्या नगरीत ५ लाख दिव्यांचा लखलखाट; गिनीज बुकमध्ये नोंद

Subscribe

दिवाळीनिमित्त अयोध्या नगरीत ५ लाखाहून अधिक दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून याची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी रोषणाईने झगमगून गेली आहे. तब्बल ५ लाख ५१ हजार दिव्यांनी अयोध्या नगरीतील शरयू घाट ते राम पायडीपर्यंत दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या आणि शेजारी असलेले फैजाबाद शहरात दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळत आहे. यासोबतच अयोध्येने २०१८ चा ३.५१ लाख दिवे लावण्याचा आपला स्वत:चाच विक्रम मोडला असून यंदाच्या रेकोर्डची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद झाली आहे.

६ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

अयोध्या नगरीतील शरयू नदीचा घाट दिव्यांनी लखलखला पाहायला मिळाला. हे दिवे लावण्याकरता तब्बल ६ हजार विद्यार्थी आणि २२० प्राध्यापक आणि व्याख्याते यांनी सहभाग घेतला होता. दीपोत्सवासाठी अयोध्या आणि फैजाबाद परिसरासह शरयू नदीच्या किनाऱ्यावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच यावेळी स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान देखील तैनात आहेत.

- Advertisement -

जड वाहनांना बंदी

तसेच दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

अशी दिवाळी ७० वर्षांनी झाली साजरी

आधीची सरकारे अयोध्येत येण्याची भीती बाळगत होती. परंतु मी गेल्या अडीच वर्षात कितीतरी वेळा अयोध्येत आलो आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताचा जगात सांस्कृतिक सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला आहे. अयोध्येत अशी दिवाळी साजरी करण्यास ७० वर्षे लागली आहेत.  – योगी आदित्यनाथ; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

- Advertisement -

हेही वाचा – परदेशी विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘दिपोत्सव’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -