Ram Mandir : आडवाणी, जोशी राहणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमीपूजनाला उपस्थित

अयोध्येत येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात. राम जन्मभूमी आंदोलनात या दोन्ही नेत्यांनी ९० च्या दशकात महत्त्वाची भूमिका बाजवली होती. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारने भूमीपूजन कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विस्तृत व्यवस्था केली आहे.

कोरोना व्हायरस तसेच वयोमानामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि हिंदुत्व चळवळीशी संबंधित असलेले नेते व्हिडीओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतील असे समजते. प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरसन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या १० टॉप नेत्यांची यादी तयार केली आहे. भूमीपूजन कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अन्य चार नेते मंचावर उपस्थित राहतील, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा –

‘या’ रेस्टॉरंटमधील ‘कोविड करी’ आणि ‘मास्क नान’ला खवय्यांची मागणी!