घरदेश-विदेशअयोध्या राम मंदिर प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होणार?

अयोध्या राम मंदिर प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होणार?

Subscribe

सर्व पक्षकारांना आज बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करण्याचे आदेश काल देण्यात आले. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमिवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते.

सुप्रिम कोर्टात सुरु असलेल्या अयोध्या येथील राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल मंगळवारी सुप्रिम कोर्टात अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा ३९वा दिवस होता. यावेळी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी बुधवारी म्हणजे आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होण्याचे संकेत दिले. यावेळी सर्व पक्षकारांना आज बुधवारी आपला युक्तीवाद पूर्ण करण्याचे आदेश काल देण्यात आले. विशेष म्हणजे, या पार्श्वभूमिवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले होते.

यावर हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा व्यक्त केली आहे. या युक्तीवादानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आज बुधवारी या प्रकरणावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. पण या सर्व गोष्टी न्यायालयावर अवलंबून आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

पक्षकारांना वेळ

या प्रकरणातील दोन्ही पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि युक्तीवादासाठी साडेतीन तासांची वेळ देण्यात येणार आहे. यामध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रत्येकी एक तास आणि युक्तीवादासाठी दोन्ही पक्षांना प्रत्येती ४५ मिनीटांचा अवधी देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होणार आहे.

कलम १४४ लागू

अयोध्येतील राम मंदिर प्रकरण खूपच संवेदनशील असल्याने अयोध्येमध्ये १० डिसेंबर पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे २ महिने येथील तब्बल २०० शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -