अशी आहे अयोध्येतील राम मंदिराची संरचना

अयोध्येतील राम मंदिर हे एकूण दोन मजल्याचं असणार आहे. या मंदिराचं बांधकाम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य सरकारचं आहे.

New Delhi
ayodhya verdict case ram mandir whole structure in ayodhya
'ही' अभिनेत्री अयोध्याविषयावरील पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणार

संपूर्ण देशाचे लक्ष लागू राहिलेल्या अयोध्या खटल्याचा निकाल शनिवारी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठांनी हा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्यासंदर्भात निकाल देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त रामलल्लाची जागा (२.७७ एकर) देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या जागेवर नवीन राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात २०२० मध्ये होणार असून सरकारचं २०२३ पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.

ट्रस्ट निर्माण करण्याचा आदेश

राम मंदिराकरिता सुप्रीम कोर्टाने येत्या ३ महिन्यांत ट्रस्ट निर्माण करण्याचा आदेश दिला आहे. या ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. उत्तर प्रदेश सरकारचं या मंदिराकरिता ५०० कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असं आहे स्ट्रक्चर

या राम मंदिराचं बांधकाम हे काहीप्रमाणात दगडाचं असणार आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणारे दगड तासण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ६० टक्के दगड तासून पूर्ण झाले आहेत. या राम मंदिराची एकूण २१२ खांबावर उभारणी केली जाणार आहे. तसंच मंदिर हे दोन मजल्यांचं असून पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीरामाची मूर्ती असेल तर दुसऱ्या मजल्यावर प्रभू श्रीरामाचा दरबार असणार आहे. मंदिराची लांबीही २७५ फुट, उंची १३५ फुट, रुंदी १२५ फुट इतकी असेल. ३६ हजार ४५० चौरस फुट इतक्या क्षेत्रफळावर हे राम मंदिर उभारलं जाणार आहे. मंदिराच्या ८ किलोमीटरच्या परिसरात हॉटेल आणि धर्मशाळा बांधण्यास परवानगी नसेल.


नक्की वाचा – Ayodhya Verdict : जाणून घ्या काय आहे ‘अयोध्या’ प्रकरण