अयोध्या प्रकरणाचा निकाल उद्या येणार!

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या वादावर अखेर पडदा पडण्याची वेळ आली असून शनिवारी सकाळी या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे.

New Delhi
Supreme court article 370 hearings on various petitions start from today
सर्वोच्च न्यायालय

अवघ्या देशाला ज्या निकालाची प्रतिक्षा होती, तो अयोध्या प्रकरणाचा निकाल अखेर उद्या म्हणजेच शनिवारी सकाळी येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ३९ दिवसांची सुनावणी झाल्यानंतर अखेर १६ ऑक्टोबर रोजी ही सुनावणी पूर्ण झाली. यानंतर महाराष्ट्र आणि हरियाणामधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधीच या प्रकरणाचा निकाल येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ती वेळ आली असून शनिवारी सकाळी साडेदहा वाजता या प्रकरणाच्या निकालाला सुरुवात होणार आहे.