कर्नाटकातील पूरग्रत भागाचा दौरा करा – बी. एस. येडियुरप्पा

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्र्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा करण्याचे आदेश दिले आहेत.

Bangalore
b s yediyurappa, minister, flood, affected villages, बी. एस. येडियुरप्पा, कर्नाटक, पूरग्रस्त
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा

कर्नाटकात नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी नवनियुक्त मंत्र्यांना कामाला लावले आहे. येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना दोन दिवस पुरग्रत भागात दौरा करण्यास तसेच नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकची जनता मुसळधार पाऊसाने त्रस्त आहे. यापूर्वी मंत्रिमंडळ नसल्यामुळे येडियुरप्पा राज्यात विविध ठिकाणी एकटेच दौरे करीत होते. अखेर तीन आठवड्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला.

येडियुरप्पा यांच्या सरकारमध्ये १७ सदस्यांचा समावेश

येडियुरप्पा सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळात १७ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळात राज्यातील अनेक दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात एका छोटेखानी कार्यक्रमात नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उपस्थित होते.


हेही वाचा – येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार संपन्न, १७ आमदारांना संधी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here