राहुल गांधींनी त्रियोग करावा कारण पुढील १० ते २० वर्षे मोदींना पर्याय नाही – बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत मोठे विधान केले आहे. पुढील १० ते २० वर्ष नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असे विधान बाब रोमदेव यांनी केले आहे. मी मोदींचा भक्त नाही पण राष्ट्रभक्त नक्कीच आहे, असे देखील बाबा रामदेव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे पुढील १० ते २० वर्षे त्यांना पर्यायच नाही आहे, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

बाब रामदेव यांनी नरेंद्र मोदी यांना पुढील १० ते २० वर्ष नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असे विधान करताना राहुल गांधी यांना त्रियोग करण्याचा सल्ला दिला. तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे. बाबा रामदेव यांना देशात मोदी फॅक्टर आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना “कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचे आहे ते देशासाठी करायचे आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे,” असे म्हणाले.

बाब रामदेव मोदी भक्त आहे, असा तुमच्यावर आरोप होतो, असे बाबा रामदेव यांना विचारण्यात आले. तेव्हा बाबा रामदेव म्हणाले मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त असून मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे.