घरदेश-विदेशपतंजलीने कोरोनाला हरविण्यासाठी सुरू केली वैद्यकीय चाचणी

पतंजलीने कोरोनाला हरविण्यासाठी सुरू केली वैद्यकीय चाचणी

Subscribe

कोरोना व्हायरसच्या चाचण्यांदरम्यान मोठ्या कंपन्यांसह आता पतंजलीचं पाऊल

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले असताना कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक कोरोनावर औषधोपचार, लस तयार करण्याचे महत्वाचे काम करत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीने पहिलं पाऊल उचललं आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोविड १९ च्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर पतंजलीने ही चाचणी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, पतंजली कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी असे सांगितले की, “आम्ही फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल बोलत नाही तर आम्ही कोरोनाच्या उपचाराबद्दल सांगत आहोत. गेल्या आठवड्यात नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कंपनीने इंदूर आणि जयपूरमध्ये कोरोना व्हायरसच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या आहेत”

- Advertisement -

मोठ्या कंपन्यांसह आता पतंजलीचं पाऊल

कोरोना व्हायरसच्या चाचण्यांदरम्यान मोठ-मोठ्या कंपन्यांची नावं समोर येत होती. यामध्ये गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कपंन्यांचा समावेश असून त्यात आता पतंजलीचे नाव देखील समाविष्ट झाले आहे.


लॉकडाऊन- ५ वर मंथन सुरू! आज कॅबिनेट सचिव राज्यांशी करणार चर्चा

वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळवणे अवघड होते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देखील हे पुढे नेण्यास रस दाखवला नाही. म्हणून पतंजली समुहाने क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलेटर ऑफ इंडियाकडे नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आणि जयपूर विद्यापीठाअंतर्गत एका विभागात वैद्यकीय चाचण्यांना सुरूवात केली असल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले. यासह कोणत्याही आयुर्वेदीक संस्थेत असलेल्या सुविधांशी आमची तुलना करता आमच्याकडे असणाऱ्या प्रयोगशाळा उत्तम आहेत. तसेच सध्या आमच्याकडे ५०० संशोधक आणि त्यापैकी कमीतकमी १०० हे पोस्ट डॉक्टरेट संशोधक आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पतंजलीकडून वैद्यकीय चाचणी सुरू

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतजली समुहाने कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार सुरू केले होते. मार्च महिन्यापर्यंत पतंजलीने अनेकांवर उपचार केले. परंतु ते वैद्यकीय चाचणीचा भाग नव्हते. आमच्या संशोधनाला उपचाराच्या रुपात आणण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. याकडेच पाहता नियामक मंडळाची मान्यता घेतल्यानंतर याची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली असल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -