घरदेश-विदेशबाबरी मशिदीचे पक्षकार पाच एकरची जमीन घ्यायला तयार पण...

बाबरी मशिदीचे पक्षकार पाच एकरची जमीन घ्यायला तयार पण…

Subscribe

'सरकारने जर आम्हाला जमीन दिली तर तिथे शाळा आणि हॉस्पिटल बांधू, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. कोर्टाच्या निकालानंतर हिंदू आणि मुस्लिमांमधली तेढ संपली आहे.'

संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या अयोध्या खटल्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल जाहीर केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तसेच ५ एकर जमीन देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाबरी मशिदीसाठी लढणारे इक्बाल अन्सारी यांनी नुकतेच एक वक्तव्य केले आहे. ‘सरकारने जर आम्हाला जमीन दिली तर तिथे शाळा आणि हॉस्पिटल बांधू, असे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. कोर्टाच्या निकालानंतर हिंदू आणि मुस्लिमांमधली तेढ संपली आहे.’, असे ते म्हणाले.

अयोध्येतील निकालानंतर सर्वच स्तरातून स्वागत केले जात असताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमिन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर नाराजी व्यक्त केली होती. ‘आजचा निकाल म्हणजे आस्थेचा विजय आहे. तसेच मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी, पाच एकर जमिनीची खैरात नको’, असे वक्तव्य करत ओवेसींनी नाराजी व्यक्त केली होती.

- Advertisement -

त्याच जमिनीतून ५ एकर जमीन द्यावी

तसेच, ‘आम्हाला या मशिदीच्या जागी मदरसा बांधून द्यावा. मुस्लिमांना दिली जाणारी जमीन सरकारने घेतलेल्या ६७ एकर जमिनीतूनच देण्यात यावी.’, अशी मागणी देखील सरकारकडे इक्बाल अन्सारी यांनी यावेळी केली. १९९१ साली केंद्र सरकारने अयोध्येतील वादग्रस्त भागांसह ६७ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. त्याच जमिनीतून ५ एकर जमीन देण्यात यावी. तसेच या ठिकाणांपासून काही अंतरावरच मशिदीसाठी जागा देण्यात आली तर ते योग्य ठरणार नाही, असे देखील ते यावेळी म्हणाले.


‘५ एकर जमिनीची खैरात नको’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -