घरदेश-विदेशआईच्या गर्भातच बाळाला संसर्ग; जन्म झाल्यावर बाळ निघालं पॉझिटिव्ह!

आईच्या गर्भातच बाळाला संसर्ग; जन्म झाल्यावर बाळ निघालं पॉझिटिव्ह!

Subscribe

ही घटना आईच्या गर्भाशयातही मुलांना कोरोना संसर्ग होऊ शकते याचा पुरावा आहे.

एका नवजात बालक जन्मानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. हे प्रकरण अमेरिकेच्या टेक्सासमधील आहे. डॉक्टरांच्या मते, ही घटना आईच्या गर्भाशयातही मुलांना संसर्ग होऊ शकते याचा पुरावा आहे. जन्मानंतर अमेरिकन नवजात मुलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तर बाळाची आई आधीच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि तिला ताप देखील होता. जेव्हा डॉक्टरांनी आई-बाळाची नाळ तपासली तेव्हा त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे लक्षात आले. मात्र, २१ दिवसांच्या उपचारानंतर आई आणि बाळाला रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

- Advertisement -

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांच्या टीमचे म्हणणे आहे की या प्रकरणातून हे सिद्ध होते की गर्भाशयात कोरोना संक्रमण होऊ शकते. गेल्या आठवड्यात इटलीच्या तज्ज्ञांनाही गर्भात कोरोना संक्रमण होत असल्याचे काही पुरावे सापडले होते.

एचआयव्ही, झिका आणि इतर अनेक व्हायरस गर्भाशयाला संक्रमित करतात. अशा परिस्थितीत, कोरोना व्हायरसही गर्भाशयातदेखील बाळास संक्रमित करू शकते की नाही हे साथीच्या रोगाच्या सुरूवातीपासूनच डॉक्टर विचार करत होते. तर काही डॉक्टरांनी असेही म्हटले आहे की, बाळाला गर्भाशयात संसर्ग झाला आहे की, त्याच्या जन्मानंतर लगेच हे शोधणे कठीण असते.


भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा सन्मान करा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -