घरCORONA UPDATEतुम्हाला टक्कल आहे? होऊ शकतो कोरोना, आम्ही नाही शास्त्रज्ञ म्हणतायत...

तुम्हाला टक्कल आहे? होऊ शकतो कोरोना, आम्ही नाही शास्त्रज्ञ म्हणतायत…

Subscribe

हा निष्कर्ष तपासून बघण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे.

नुकत्याच एका रिसर्च मधून टक्कल असलेल्या पुरूषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. जानेवारीत चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा प्रकारच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांना जास्त आहे. असं या शास्त्रज्ञांच म्हणणं आहे.

हा निष्कर्ष तपासून बघण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे. स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ४१ कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी ७१ टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. तर ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, १२२ कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं,  त्यातील ७९ टक्के रुग्णांना टक्कल असल्याचं निष्पन्न झालं.

- Advertisement -

टक्कल आणि कोरोनाचा असा आहे संबंध

संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात संबंध आहे. संशोधकांचा असा दावा आहे की पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात. याआधी करण्यात आलेल्या एका अभ्यासात दावा केला होता की, पुरुषांच्या रक्तात अशा रेणूंची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, जी सहजपणे कोरोना विषाणूचे वाहक बनतात.


हे ही वाचा – ‘या’ राज्यात कोरोना रूग्ण ४२, तरीही पुन्हा लॉकडाऊन वाढवला!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -