घरदेश-विदेशनमो APP वर पण बंदी घाला; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

नमो APP वर पण बंदी घाला; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Subscribe

देशातील जनतेची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ चीनी मोबाइल अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवरही बंदी घाला अशी मागणी केली आहे. वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारं नमो अ‍ॅपही बंद केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे.

“१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp,” अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

- Advertisement -

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने २९ जूनरोजी ५९ चीनी अॅप्सवर बंदी घालत चीनवर डिजिटल स्ट्राईक केलं. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. टिक-टॉक, यूसी ब्राऊझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे.


हेही वाचा – Photo: सरन्यायाधीश शरद बोबडेंनी लुटला सुपर बाईकचा आनंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -