घरताज्या घडामोडी'चीनी अ‍ॅप्स बॅन करणं हे कोरोना घालवण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखं आहे'

‘चीनी अ‍ॅप्स बॅन करणं हे कोरोना घालवण्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखं आहे’

Subscribe

गायक, संगीतकाराने केली मोदींवर टीका

केंद्र सरकारने भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यावरून गायक आणि संगीतकार विशाल दादलानी यानं सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारतात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर भारताने चीनी ड्रॅगनवर थेट डिजिलट स्ट्राईक केली आहे. केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयानंतर गायक संगीतकार विशाल ददलानी सरकारवर टीका केली आहे. “चीनी अ‍ॅप्स बॅन करणं हे तसंच आहे जसं करोनाचा सामना करण्यासाठी टाळ्या वाजवणं आणि दिवे लावणं,” असं म्हणत त्यानं सरकारवर टीका केली आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ अ‍ॅपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या अ‍ॅपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सव्‍‌र्हरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

हे ही वाचा – टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर भारताची बंदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -