पाटणात पुढील पंधरा दिवस मासे विक्रीवर बंदी

माशांमध्ये रसायनांचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे पटणात मासे विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत १५ दिवस मासेविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मासे विकल्यास विक्रेत्याकडून १० लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे.

Patana
Fish selling
प्रातिनिधिक फोटो

बाजारात विकल्या जाणाऱ्या मास्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायन आढळल्याने पटणात मासे विक्रीवर बंदी टाकण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. येत्या १५ दिवसांपर्यंत मासे विकण्यास सरकारने बंदी घातली आहे. रासायनिक मास्यांचा परिणाम लोकांच्या प्रकृतीवर होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. पटणाच्या अन्न व औषध विभागाने मास्यांचे काही नमुने गोळा केले आहे. यामध्ये १० पैकी ७ नमुन्यांमध्ये रासायनीक तत्वे आढळली होती. प्रयोग शाळेमध्ये तपास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंध्रप्रदेश, असाम, केरळ, तामिळनाडू आणि बंगाल येथून आलेल्या मास्यांमध्ये रसायनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले. यानंतर राज्यात ठिकठिकाणी मास्यांचे नमुने गोळा केले जात आहे. दरम्यान याचा फटका मासे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात पडणार आहे.

“मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेश आणि बंगालहून येणाऱ्या मास्यांमध्ये रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. या मास्यांचे निरिक्षण करण्यात आले त्यावेळी हे मासे खाण्यास योग्य नसल्याचे आढळून आले. या राज्यातून येणाऱ्या मास्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जर या निर्णयानंतरही कोणी मासे विकत असेल तर विक्रेत्याकडून १० लाखांचा दंड आकारण्यात येईल.”- आरोग्य विभागाचे सचिव संजय कुमार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here