घरदेश-विदेशकॅब बुक करणं महिलेला पडलं महागात

कॅब बुक करणं महिलेला पडलं महागात

Subscribe

कुठेही जायचं असेल, तर फोनवरील ट्रॅव्हलिंग अॅप काढून लगेच आपण कॅब बुक करतो. सगळ्यात सेफ आणि क्विक पर्याय म्हणून या अॅपचा मेट्रोसिटीमध्ये सर्रास केला जातो. पण बंगळुरुमधील एका महिलेला ही कॅब महागात पडली. घरापासून एअरपोर्टपर्यंतचा प्रवास करताना तिला आलेला अनुभव ऐकाल तर तुम्हालाही या कॅब सुविधा पुरवणाऱ्या या अॅप्सवरचा तुमचा विश्वास उडून जाईल.

नेमकं काय घडलं त्या रात्री ?

बंगळुरुमधील जेबी नगरमध्ये राहणारी महिला १ जूनला मुंबईप्रवासासाठी निघाली. रात्री २ वाजता तिने तिच्या घरापासून ते बंगळुरु एअरपोर्टपर्यंत कॅब बुक केली. कॅब आली ती कॅबमध्ये बसली. पण एअरपोर्टचा नेहमीचा रस्ता सोडून ड्रायव्हरने वेगळाच रस्ता पकडला. हे लक्षात येताच तिने ड्रायव्हरला हटकलं. पण ड्रायव्हरने हा रस्त्यावरुन टोल लागणार नाही आणि लवकर पोहोचू असे सांगितले. पण एअरपोर्टपासून काही मिनिटावर असताना त्याने वेगळ्या रस्त्यावर गाडी थांबवली. गाडी लॉक केली. आणि महिलेकडून तिचा फोन हिसकावून घेतला. आणि त्या महिलेवर बळजबरी करायला सुरुवात केली. तिला कपडे काढायला सांगून तिचे फोटो काढले. ओलाचा नंबर सोडून त्याने स्वत:च्या खासगी नंबरच्या व्हॉटसअपवर त्या महिलेचे फोटो पाठवले.या घटनेची वाच्यता केल्यास हे फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी दिली आणि त्याने तिला रात्री ३च्या सुमारास एअरपोर्टला सोडलं. या घटनेनंतर महिला प्रचंड घाबरली होती. सकाळची मुंबईची फ्लाईट पकडून ती मुंबईला पोहोचली आणि तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

ड्रायव्हर ब्लॅकलिस्टेड

अॅपवरुन गाडी बुक करताना त्या ड्रायव्हरचा फोन नंबर मिळतो. तो नंबर त्या महिलेकडे होता. त्यामुळे ड्रायव्हरचे नाव कळण्यास मदत झाली . व्ही वरुण असे या ड्रायव्हरचे नाव असून त्याला ओला कंपनीकडून ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.

या आधीही कॅबमध्ये घडले असे प्रकार

दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या घृणास्पद घटनेनंतर खासगी बस, गाड्यांमधील विश्वास उडून गेला. त्यानंतर आलेल्या ओला, उबर या खासगी कॅब पुरविणाऱ्या कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करत अॅपमध्ये अनेक बदल केले. ड्रायव्हरच्या नंबरपासून ऑनलाईन ट्रॅकिंगपर्यंतचे पर्याय अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले. तरीसुद्धा अशा घटना घडत आहेत. गेल्या ५ ते ६ महिन्यात कॅबमध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रवासात महिला सुरक्षित कधी होणार ? हा प्रश्नच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -