घरअर्थजगतकर्ज झालं स्वस्त; बँक ऑफ महाराष्ट्रासह या बँकेने केली व्याजदरात कपात

कर्ज झालं स्वस्त; बँक ऑफ महाराष्ट्रासह या बँकेने केली व्याजदरात कपात

Subscribe

बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँक या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एमसीएलआर (Marginal Cost of Fund based Lending Rate ) ०.१० टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे आता कर्ज स्वस्त होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँक नवा कर्जदर १० सप्टेंबरपासून लागू करणार आहे. तर बॅक ऑफ महाराष्ट्राचे दर सोमवारपासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्जाचे नवे दर

बँक ऑफ महाराष्ट्रने एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.४० वरून ७.३० टक्के केला आहे. तर सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर कर्जांचा दर ७.३० ऐवजी ७.२५ टक्के केला आहे. सोमवारपासून बँकेचे नवीन दर लागू झाले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने १५ दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर दर सुअनुक्रमे ६.८० टक्के, ७ टक्के आणि ७.२० टक्के लागू केला आहे.

- Advertisement -

इंडियन ओव्हरसीज बँकेने केला एमसीएलआर दर कमी

इंडियन ओव्हरसीज बँकेने एमसीएलआरमध्ये ०.१० टक्क्यांची कपात केली आहे. बँकेच्या एक वर्षाच्या कर्जाचे एमसीएलआर अनुक्रमे ७.५५ टक्के (आधीचे ७.६५), तीन महिन्यांच्या आणि सहा महिन्यांच्या एमसीएलआर दर अनुक्रमे ७.४५ टक्के आणि ७.५५ केलं आहे. १० सप्टेंबरपासून बँकेचे नवीन दर लागू होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने सतत रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात कपात केल्यामुळे बँकांवर त्यांच्या कर्जाचे दर कमी करण्याचा दबाव आहे. जेणेकरून या वेळी अधिकाधिक लोक कर्ज घेण्यासाठी पुढे येऊ शकतील आणि अर्थव्यवस्थेतील पैशांचे आवर्तन सुरूच राहील. देशात कोरोना विषाणू आणि गेल्या काही महिन्यांपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडींवर वाईट परिणाम झाला आहे. लोक कर्जही कमी घेत आहेत. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोका कर्ज घ्यावं हा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी बँकांना दर नियमितपणे कमी करण्यास सांगितले जात आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -