घरदेश-विदेशमहिनाअखेरीस ६ दिवस बँका बंद राहणार!

महिनाअखेरीस ६ दिवस बँका बंद राहणार!

Subscribe

पुढच्या १४ दिवसांत ६ दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा बँकेशी संबंधित जी काही कामे आहेत ती वेळेअगोदर करुन घ्यावे लागणार आहेत.

सध्ये देशात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच २४ ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर लगेच दिवाळी उत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या देखील सुरु होणार आहेत. मात्र, या सर्व घडामोडींच्या तोंडावर पुढच्या १४ दिवसांपैकी ६ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी धावपळ होण्यापेक्षा बँकेशी संबंधित जी काही कामे आहेत ती वेळेअगोदर करुन घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा – पीएमसी बँकेच्या २ खातेदारांचा मृत्यू

- Advertisement -

‘या’ दिवशी बँका असणार बंद

रविवारी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी नियमानुसार बँका बंद राहतील. २२ ऑक्टोबर रोजी बँकांच्या विलिनिकरणाविरोधात अखिल भारतीय बँक कर्मचारी आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. या संपाला भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दिवशी देखील बँक बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु होणार आहे. याशिवाय यादिवशी रविवार निमित्ताने देखील बँकांना सुट्टी असणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा निमित्ताने देशातील विविध बँकांना सुट्टी असणार आहे. याशिलाय २९ ऑक्टोबरला भाऊबीज निमित्ताने बँका बंद राहतील. त्याचबरोबर ३१ ऑक्टोबर रोज विविध कारणांमुळे देशातील बँका बंद राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -