ती वादळात जन्मली; पालकांनी नाव ठेवले ‘फनी’

ओडिशाच्या मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका ३२ वर्षीय महिलेने सकाळी ११ वाजता गोंडस चिमुकलीला जन्म दिला. विशेष म्हणजे फनी चक्रीवादळामुळे या चिमुकलीचे नाव देखील फनी ठेवण्यात आले आहे.

Odisha
Newborn girl named after Cyclone Fani
वादळानंतर बाळाचे नाव ठेवले फनी

फनी चक्रीवादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले असून या चक्रीवादळाने धुमाकुळ घातला आहे. फनी चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये ४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळा दरम्यान एका चिमुकलीचा जन्म झाला आहे. तिच्या जन्मामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. फनी चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये ओडिशाच्या मनचेश्वर रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका ३२ वर्षीय महिलेने सकाळी ११ वाजता गोंडस चिमुकलीला जन्म दिला. विशेष म्हणजे फनी चक्रीवादळामुळे या चिमुकलीचे नाव देखील फनी ठेवण्यात आले आहे. चिमुकलीची आई रेल्वेमध्येच नोकरी करते. सध्या बाळ आणि आई दोंघीची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वादळामुळे बाळाचे नाव ठेवले तितली

बाळाची आी मनचेश्वर रेल्वे रिपेअर विभागामध्ये मदतनीस म्हणू काम करते. फनी हे तिचे पहिले बाळ आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये ‘तितली’ या चक्रीवादळाने कहर केला होता. त्यावेळी देखील गंजम, जगतसिंहपूर आणि नयागड येथे तितली चक्रीवादळाने मोठा धुमाकुळ घातला होता. नयागड येथे एका कुटुंबामध्ये एक चिमुकली जन्माला आली. या चिमुकलीचे नाव त्यांनी ‘तितली’ असे ठेवले होते.

फनी वादळाने घेतला ४ जणांचा बळी

गेल्या काही दिवसापासून ओडिशाच्या किनारपट्टीवर फनी चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. आज सकाळी साडेआठ वाजता हे चक्रीवादळ ओडिशामध्ये धडकले. या चक्रीवादळाने ओडिशामध्ये धुमाकुळ घातला आहे. यामध्ये आतापर्यंत ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे ओडिशामध्ये घरांचे मोठे नुसान झाले आहे. तर झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here