घरटेक-वेकम्हणून स्टिव्ह जॉब्सने मुलीच्या शिक्षणाकडे दिले नाही लक्ष

म्हणून स्टिव्ह जॉब्सने मुलीच्या शिक्षणाकडे दिले नाही लक्ष

Subscribe

स्टिव्ह जॉब्स हे अॅपलचे सर्वेसर्वा आहेत हे अगदी शेंबड मुलही सांगेल. पण त्यांनी त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले नाही. त्यांनी अर्ध्यावरच शिक्षण सोडून दिले.

चांगल्या आयुष्याची स्वप्न पाहात असाल तर ती सत्यात उतरवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि तेच आपण आपल्या लहानमुलांना देखील सांगतो. ‘शिकलास तरच काही तरी होईल’, हे आपलं अगदी ठरलेलं वाक्य.. पण अॅपलचे सर्वेसर्वा स्टिव्ह जॉब्स यांना मात्र शाळा आणि कॉलेज म्हणजे मूर्ख घडवण्याचे ठिकाण वाटत होते. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाची कधीच चिंता केली नाही. या विषयी दिवगंत स्टिव्ह जॉब्स यांची मुलगी लिसा ब्रेनान सध्या एक पुस्तक लिहीत असून त्यात तिने याचा उल्लेख केला आहे.

वाचा- लवकरच येत आहेत अॅपल वॉच 4, वाचा किंमत

का स्टिव्ह जॉब्सनी शिक्षणाला महत्व दिले नाही?

स्टिव्ह जॉब्स हे अॅपलचे सर्वेसर्वा आहेत हे अगदी शेंबड मुलही सांगेल. पण त्यांनी त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले नाही. त्यांनी अर्ध्यावरच शिक्षण सोडून दिले. त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षण आणि तेही साचेबद्ध शिक्षण मुलांना मूर्ख बनवते, असे ते मानत म्हणून त्यांनी कधीच चार भिंतीतील शिक्षणाला महत्व दिले नाही. आणि त्यामुळेच त्यांनी मुलीच्या शिक्षणाकडेही फार लक्ष दिले नाही. असे त्यांच्या मुलीने तिच्या पुस्तकात लिहिले आहे. ‘स्मॉल फ्राय’ नावाचे पुस्तक ती सध्या लिहीत आहे. त्यात तिने याचा उल्लेख केला आहे. या विषयी अधिक सांगताना त्यांच्या मुलीने सांगितले की, मी आईकडेच वाढले. एकदा स्केटींग करण्यासाठी स्टिव्ह मुलीच्या स्टँडफोर्ड विद्यापीठात गेले होते. तिथून परतत असताना त्यांनी लिसाला शिक्षणाच्या मागे लागल्यामुळे कल्पकता कशी कमी होते ते पटवून सांगितले.

- Advertisement -
वाचा- अॅपलचे तीन नवे स्मार्ट फोन लाँच; भारतात या किंमतीत मिळणार

पाहा काय म्हणाले होते स्टिव्ह जॉब्स शिक्षणाविषयी

- Advertisement -

बायोग्राफीतही उल्लेख

स्टिव्ह यांचे आयुष्य उलगडणारे आत्मचरित्र या आधीच आलेले आहे. शिक्षणाविषयीची त्यांची मते या पुस्तकात नोंदवण्यात आली आहेत. त्यांनी शाळा आणि महाविद्यालये ‘bozos’ घडवण्याचे काम करते असे ते नेहमी म्हणत. bozos म्हणजे मूर्ख.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -