घरताज्या घडामोडीदिल्लीत तीव्र उष्णतेची लाट; कमाल तापमान ४५ अंश

दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट; कमाल तापमान ४५ अंश

Subscribe

दिल्लीचे कमाल तापमान ४५ अंशाच्या वर गेले आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांतही उन्हाचे चटके भासू लागले आहेत.

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीत उन्हाचा ताप अधिकच वाढत आहे. दिल्लीचे कमाल तापमान ४५ अंशाच्या वर गेले आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांतही उन्हाचे चटके भासू लागले आहेत. दिल्लीत तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. तर शनिवारी राजस्थानमधील चुरू आणि श्रीगंगानार येथे सर्वाधिक उष्णता होत असून येथील पारा ४७ अंशांवर पोहोचला आहे.

उष्णतेची लाट

मे महिन्याचा चौथा आठवडा सुरू असून आता जून महिन्याला सुरुवात होण्यासाठी केवळ एकच आठवडा शिल्लक आहे. मात्र, असे असताना देखील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस झाला आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवू लागली नाही. मात्र, आता उष्णतेला सुरुवात झाली असून उष्णतेची लाट जाणवू लागली आहे.

- Advertisement -

या राज्यात पारा ४७ अंशांवर पोहोचला

राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रमधील तापमान अधिक वाढले असून या राज्यात पारा ४७ अंशांवर गेला आहे.

२४ तासांतील सर्वात हॉट शहरे

गेल्या २४ तासांत राज्यातील काही शहरे ही हॉट शहरे ठरली आहेत. यामध्ये पाच शहरे ही एकट्या राजस्थानमधील आहेत. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधील दोन शहरात अधिक उष्णता जाणवू लागली आहे. तर यामध्ये युपीच्या एका शहराचा देखील समावेश आहे.

- Advertisement -
  • राजस्थानमधील चुरु, श्रीगंगानगर, पिलानी, बीकानेर आणि कोटा या शहरात अधिक उष्णतेचे चटके बसले आहेत. या शहरात पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे.
  • तर महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपुरमध्ये सर्वात जास्त उष्णता आहे. या शहरात पारा ४५ अंशाच्या वर आहे.
  • उत्तर प्रदेश मधील झांसी या शहरात पारा ४६.१ इतका आहे. तर मध्य प्रदेश मधील नौगांव आणि खजुराहो या शहरात पारा ४५ अंशाच्यावर आहे.

पुढील ५ दिवस उन्हापासून सुटका नाही

पुढचे पाच दिवस राजस्थानमध्ये उन्हापासून सुटका होणार नाही. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार; मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तीव्र उष्णता होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम राजस्थानला येत्या २४ तासांत प्रचंड उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे.


हेही वाचा – आतापर्यंत ४५ लाख श्रमिकांना गावी सोडलं, ८० टक्के प्रवासी यूपी-बिहारचे – रेल्वे मंत्रालय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -