Lebanon Beirut : महिनाभरानंतर पुन्हा आगीने धगधगले बैरूत शहर

साधारण महिनाभरापूर्वी भीषण स्फोटांनी उद्धवस्त झालेल्या लेबननमधील बैरूत बंदरावर पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. आज, गुरुवारी बैरूत बंदरावर आगीचा उंच लोळ दिसल्याने स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली. या आगीच्या वेळी कोणताही स्फोट झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गेल्या महिन्यात बैरूत येथे झालेल्या स्फोटात जवळपास १५० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, सहा हजारांहून अधिक जखमी झाले होते. या बंदर परिसरातील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी बैरूत बंदराजवळ आगीचे प्रचंड लोळ पाहायला मिळाले. त्यामुळे अनेकांना त्या स्फोटाची आठवण झाली. ही आग कशी लागली, याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर आली नाही. या ठिकाणी इंधन आणि टायर जाळल्यामुळे हे आगीचे लोळ उठले असावेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा –

Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR