घरCORONA UPDATEसुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन

सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन

Subscribe

सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे गुजरातमध्ये निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते आजारी होते. गेल्या आठवड्यात त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. बेजान दारूवाला यांच्या निधनावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले आहे. बेजान दारूवाला हे अहमदाबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. ज्योतिष शास्त्रासोबतच वास्तू आणि खगोल शास्त्रांचाही त्यांचा अभ्यास दांडगा होता. या सर्व विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. सिनेकलाकारांचाही त्यांच्या या विद्येवर विश्वास असल्याचे यापूर्वी अनेक कार्यक्रमांमधून पाहण्यात आले आहे.

हेही वाचा – आता लॉकडाऊनची जबाबदारी त्या त्या राज्यावर देण्याची शक्यता!

- Advertisement -

सेलिब्रिटींची भविष्यवाणी करणारे दारूवाला 

ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा जन्म मुंबईतील पारसी कुटुंबात झाला होता. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २२ मे रोजी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील महापालिकेने त्यांचे नाव कोरोना पॉझिटिव्ह यादीत सामील केले होते. त्यांच्या मुलाने सांगितले की, सायंकाळी ५ वाजता बेजान दारूवाला यांची प्राणज्योत मालवली. बेजान दारूवाला यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची भविष्यवाणी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -