घरदेश-विदेशअंत्यविधीवरुन परतताना भीषण अपघात; ६ महिलांचा मृत्यू

अंत्यविधीवरुन परतताना भीषण अपघात; ६ महिलांचा मृत्यू

Subscribe

गोकाक फॉक्सजवळच्या गावात नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी हे सर्व जण गेले होते. अंत्यविधी आटपून सर्वजण परत निघाले होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली.

बेळगावमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहे. गोकक तालुक्यातील हीरेनंदी गावाजवळ मंगळवारी सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सहाही महिलाच आहे. तर जखमी झालेल्यांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अशी घडली घटना

नातेवाईकाचा अंत्यविधी करुन घरी परतणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला आहे. अपघातातील मृत आणि जखमी सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी गावातील रहिवासी आहेत. गोकाक फॉक्सजवळच्या गावात नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी हे सर्व जण गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर सर्वजण परत निघाले होते. दरम्यान रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले.

- Advertisement -

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु

जखमी झालेल्या १० जणांना गोकाक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत झालेल्या महिलांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोकाक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सहा महिला एकाच कुटुंबातील आहेत. गंगव्वा हुराली (३० वर्ष), कशव्वा (७० वर्ष), यल्लव्वा पुजारी (४५ वर्ष), यल्लव्वा गुंडाप्पानवावर (४० वर्ष), रेनुका सोपडला (३५ वर्ष) आणि मल्लवा अशी मृत महिलांची नावं आहेत. या अपघाताचा तपास कर्नाटक पोलिसांकडून सुरु आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात; २ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -